Kokan Bajar Landmarks

१००% मराठी कोकणी उद्योजकांच्या, कोकण बाजार®ने दोन वर्षातच विक्रमी ५० कोकण बाजार यशस्वीपणे आयोजित केले.

कोकण बाजार® इतक्या वेगाने वाटचाल करण्यामागचं गुपित या लेखाच्या माध्यमातून आज तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आपल्या आसपास काहीतरी इतकं अद्भुत घडतंय, हि भावनाच भन्नाट आहे.

आपली देवभोळी, साधी माणसं, त्यांना खेकडे – सरडे अशा फालतू टोमण्यातून हिणवल्याशिवाय आपल्यातीलच बऱ्याच जणांचा दिवसहि जात नाही, आणि अनेक नेत्यांची रटाळ भाषणंहि पूर्ण होत नाहीत.

ते’ लोक एकमेकांना साथ देतात – ती सुद्धा उद्योगात – आणि, हे तब्बल ३ वर्ष नित्यनियमाने सुरु आहे – भारी ना.

बाकी पक्ष, नेते – रुसवे फुगवे,गाव आणि वाडीतली, भावकीतली भांडणं, राहू दे बाजूला – एक सांगा – आपली माणसं एकत्र आलेली पाहून समाधान वाटतं ना.

आज मराठी माणसाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास एक हक्काची बाजारपेठ उभी राहिली आहे – उद्योजकांसाठी हे व्यासपीठ नक्कीच एक वरदान आहे.

श्री. अजय यादव, संस्थापक – कोकण बाजार

कोकण बाजार, हि निव्वळ चर्चा, भाषणं, विचारमंथन वगैरे नाही – हे प्रॅक्टिकल मार्केट आहे.

आपल्या माणसाला उद्योग करता येत नाही, कारण त्याला बाजारात जागाच दिली जात नाही.

हि जागा, म्हणजे नुसती रिअल इस्टेट नाही – जागा म्हणजे व्यवसायात टीकण्याचा वाव – आणि, आयुष्याची कमाई लावून कोणी व्यवसाय सुरू केलाच तर मार्केट मधली परप्रांतीयांची लॉबी हैराण करून सोडते.

आपल्या माणसाकडे सोनं पिकवण्याची क्षमता आहे, आणि ग्राहकाला तेच सोनं भेसळ न करता देण्याची, अस्सल नियत आहे – ती या उपऱ्यांकडे नक्कीच नाही. पण, सोनं देऊ शकणाऱ्याला बाजारापासून लांब, खूपच लांब ठेवलं जात – आणि ग्राहक म्हणून आपल्या मिळतो ‘ठेंगा’ – भैय्याचा भेसळ केलेला माल.

आपण सवयीनुसार दोन दुकानांपैकी, मोठ्या दुकानात जाणार, अर्थातच परप्रांतीयांच्या – आणि मग, आपणच भाषण ठोकायचं – आपल्या माणसाला मुळात धंदाच करता येत नाही, वगैरे वगैरे…

कारण माहिती आहे – आमचे खापर पणजोबा, त्याचे पूर्वज, सगळे महाराजांच्या स्वराज्यासाठी तलवार घेऊन लढत होते, मुघलांना नामोहरम करत होते – तेव्हा ह्या मिठाईवाल्यांचे पूर्वज मुघलांशी साटंलोटं करून धंदाच करत होते. त्यानंतरचे पूर्वज बंदुका, पिस्तुले घेऊन इंग्रजांशी झुंझत होते, फासावर चढत होते, काळ्यापाण्याची शिक्षा भोगत होते, तेव्हासुद्धा मिठाईवाल्यांचे पूर्वज मिठाईच विकत होते – मग, ते व्यवसायात आपल्यापेक्षा सरस आहेत त्यात नवल ते काय?

Kokan Bajar Marketplace - १००% मराठी कोकणी उद्योजकांच्या, कोकण बाजार®ने दोन वर्षातच विक्रमी ५० कोकण बाजार यशस्वीपणे आयोजित केले.

भाषणात कायम मराठी – मराठी करायचं आणि व्यवसायाशी निगडित काही असल्यास मात्र, पैसे खाऊ घालणारा कोणीही चालतो – असं कसं चालेल दादा!!!

म्हणूनच, ®कोकण बाजार – आपला समुदाय, आपला बाजार.

आपल्या लोकांनी आपल्याच लोकांसाठी घडवलेला, १००% मराठी कोकणी उद्योजकांसाठीच राखीव बाजार.

आपल्या मराठी उद्योजकांकडून थेट खरेदी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *