कोकण बाजार प्रदर्शनं · १००% मराठी उद्योजक

तुमच्या व्यवसायाची हक्काची बाजारपेठ

कोकण बाजार प्रदर्शनात स्टॉल बुक करा आणि मराठी उद्योजकांकडून खरेदी करायला येणाऱ्या मराठी कुटुंबांपर्यंत पोहोचा. कॅटेगरीनुसार नियोजन, सोपे हप्ते आणि शेवटच्या दिवसापर्यंत सोबत असणारी टीम.

  • 121प्रदर्शनांचं आयोजन
  • 145+उद्योजकांनी ऑनलाइन बुकिंग केली
  • ₹5,000पासून स्टॉल, सर्व दिवस
  • ₹1,000मध्ये बुकिंग, बाकी हप्त्यांत
119 Borivali - Kokan Bajar बुकिंग सुरू 119 Borivali - Kokan Bajar 4Fri5Sat6SunDec 202611 AM – 9 PM Anandrao Pawar Highschool फक्त ₹5,0006 स्टॉल उपलब्धस्टॉल पहा →

आगामी प्रदर्शनं

तुमचं प्रदर्शन निवडा

Limited Stalls – First Come First Serve. प्रदर्शन निवडा आणि लेआउट, स्टॉल प्रकार, दर व कॅटेगरी पहा.

स्टॉल व दर

सोपे स्टॉल, स्पष्ट दर

119 Borivali - Kokan Bajar साठीचे दर. सर्व दिवसांसाठी एकच दर – कोणतेही छुपे शुल्क नाही.

हॉलमध्ये

L Stall – Non-AC Hall

6 Ft Frontage × 4 Ft Depth

₹6,000

हॉलमध्ये

Single Table Stall – Non-AC Hall

4 Ft Frontage × 2 Ft Depth

₹5,000

स्टॉलची पूर्ण माहिती व लेआउट पहा →

कोकण बाजारच का?

फक्त स्टॉल नाही – एकत्र मोठं होणारं कुटुंब

१००% मराठी उद्योजक

फक्त मराठी उद्योजकांसाठी उभं केलेलं प्रदर्शन. ग्राहक आपल्या माणसांना साथ द्यायला येतात.

कॅटेगरीनुसार नियोजन

प्रत्येक कॅटेगरीसाठी ठरावीक स्टॉल – त्यामुळे एकाच वस्तूचे दहा स्टॉल नाहीत, सर्वांना योग्य व्यवसाय.

प्रत्येक प्रदर्शनाची प्रसिद्धी

Instagram, WhatsApp व स्थानिक प्रसिद्धीमुळे कुटुंबं प्रदर्शनाला येतात – तुमच्या स्टॉलला खरे ग्राहक मिळतात.

सोपे व सुरक्षित पेमेंट

₹1,000 Razorpay वर भरून बुकिंग करा, बाकी रक्कम प्रदर्शनाआधी हप्त्यांत भरा.

सोबत राहणारी टीम

स्टॉल निवडण्यापासून प्रदर्शनाच्या दिवसापर्यंत कोकण बाजार टीम एका WhatsApp वर.

स्टॉल स्वतः निवडा

लेआउट पाहून उपलब्ध स्टॉलमधून तुमचा स्टॉल नंबर निवडा (लेआउट असलेल्या प्रदर्शनात).

बुकिंग कशी करावी

३ सोप्या टप्प्यांत तुमचा स्टॉल

  1. 1

    प्रदर्शन व स्टॉल निवडा

    प्रदर्शन उघडा, लेआउट, दर आणि तुमची कॅटेगरी पहा.

  2. 2

    ऑनलाइन पेमेंट

    ₹1,000 (किंवा पूर्ण रक्कम) Razorpay वर सुरक्षित भरा.

  3. 3

    स्टॉल निश्चित

    बुकिंगची खात्री मिळते. प्रदर्शनापर्यंत आमची टीम मार्गदर्शन करते.

FAQ

बुकिंगआधीचे प्रश्न

स्टॉल कोण बुक करू शकतो?

ज्यांची उत्पादनं त्या प्रदर्शनाच्या परवानगी असलेल्या कॅटेगरीत बसतात असे मराठी उद्योजक. प्रत्येक प्रदर्शनाच्या पानावर कॅटेगरी दिल्या आहेत.

स्टॉलमध्ये काय मिळतं?

स्टॉल प्रकारानुसार – उदा. कव्हरसह टेबल व खुर्च्या. नेमकी यादी प्रत्येक प्रदर्शनाच्या पानावर "स्टॉल व दर" मध्ये आहे.

बुकिंगसाठी किती भरावे लागतात?

₹1,000 भरून बुकिंग करता येते, बाकी रक्कम प्रदर्शनाआधी हप्त्यांत. पूर्ण पेमेंटवर सूट असल्यास ती मिळते.

स्टॉल नंबर मी निवडू शकतो का?

हो, लेआउट असलेल्या प्रदर्शनात उपलब्ध स्टॉलमधून निवडता येतो. काही प्रदर्शनांत स्टॉल नंबर प्रदर्शनाआधी टीमकडून दिले जातात – तसं पानावर लिहिलेलं असतं.

प्रत्येक कॅटेगरीला ठरावीक स्टॉल का?

प्रत्येक उद्योजकाला योग्य व्यवसाय मिळावा आणि ग्राहकांना विविधता मिळावी म्हणून. म्हणूनच लवकर बुकिंग फायद्याची.

ऑनलाइन पेमेंट सुरक्षित आहे का?

पेमेंट Razorpay द्वारे होतं. तुमची बुकिंग व पेमेंट तुमच्या कोकण बाजार बुकिंग पानावर दिसतात.

बुकिंग रद्द करायची असल्यास?

तुमच्या बुकिंग पानावरून रद्द करण्याची विनंती करता येते. बुकिंगच्या वेळी दाखवलेल्या कोकण बाजार रद्दीकरण धोरणानुसार प्रक्रिया होते.

Limited Stalls · First Come First Serve

तुमच्या व्यवसायासाठी योग्य स्टॉल शोधूया

तुम्ही काय विकता ते सांगा. योग्य प्रदर्शन व स्टॉल आमची टीम सुचवेल – विचारण्यासाठी पैसे लागत नाहीत.

चला, आपली माणसं मोठी करूया!

STALL BOOKING ENQUIRY

Let’s find your stall

119 Borivali – Kokan Bajar

Tell us a little about your business. Our team will help you choose a suitable stall. No payment needed now.

We use your details to respond to this enquiry. You can ask us to stop follow-ups anytime. Privacy Policy

स्टॉल फक्त ₹5,000119 Borivali - Kokan Bajar
बुक करा →